किसान गोष्टी कार्यक्रम

किसान गोष्टी कार्यक्रम


नवरत्न फार्मर्स क्लब आणि संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने बिलोली येथे आयोजित किसान गोष्टी कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या पीक संरक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करून एकत्र येण्याचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय, एकात्मिक शेती प्रणालीची उपयुक्तता पटवून देण्यात आली. जैन इरिगेशनचे श्री. संजय मुटकुळे यांनी पाणी आणि पोषक तत्वांचा कार्यक्षम वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. बिलोली येथील श्री.प्रकाश जेठे यांच्या शेताला भेट देऊन सहभागींना शेड नेट आणि भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व शेतकऱ्यांनी बिलोली येथे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. #कृषी #शेतकरी #बिलोली #पीकसंरक्षण #शेतकरीउत्पादककंपनी #एकात्मिकशेती #सिंचन







Post a Comment

0 Comments