ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेळीपालन...

ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेळीपालन...

जागतिक शेळी दिनानिमित्त, सगरोळी कृषि विज्ञान केंद्राने कटकळंब, ता. कंधार येथील महिला शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात महिलांना शेळीपालनाच्या विविध पैलूंबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. शेळीपालन कसे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते, शेळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, त्यांच्या पोषणाची गरज काय आहे आणि बाजारपेठेत शेळीच्या उत्पादनाची मागणी कशी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमात देण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट कृषि विज्ञान केंद्राच्या उस्मानाबादी शेळीपालन प्रकल्पाला भेट देऊन करण्यात आला. यात महिलांना शेळीपालन प्रत्यक्षात कसे केले जाते, हे दाखवून दिले. या कार्यक्रमात एकूण 17 महिलांनी सहभाग घेतला. #जागतिकशेळीदिवस #महिलाशेतकरी #शेळीपालन #कंधार #महिलासक्षमीकरण #आर्थिकसक्षमीकरण #उस्मानाबादीशेळीपालन #कृषि #ग्रामीणमहिला #महाराष्ट्र #ग्रामीणविकास #स्वयंरोजगार #आत्मनिर्भरभारत #महिलाउद्योजक #पशुसंवर्धन






Post a Comment

0 Comments