पोषण जनजागृती कार्यक्रम
राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने, संस्कृति संवर्धन मंडळाच्या हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत एक विशेष पोषण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या डॉ. माधुरी रेवणवार यांनी संतुलित आहाराचे महत्त्व आणि विविध पोषक तत्त्वांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी 'पोषण बाग' या संकल्पनेवर विशेष भर दिला. पोषण बागेमुळे वर्षभर कुटुंबासाठी ताज्या भाज्या आणि फळे उपलब्ध होतील, ज्यामुळे आरोग्य उत्तम राखता येईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि आरोग्यदायी तसेच पोषणयुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी, विशेषतः महिलांचे मनःपूर्वक आभार! #राष्ट्रीयपोषणमहिना #पोषणमहिना२०२५ #पोषणजागृती #संतुलितआहार #पोषणबाग #आरोग्यपूर्णजीवनशैली #संस्कृतिसंवर्धनमंडळ #ClimateSmartSustainableDevelopmentProject #BCRC #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #kvksagroli
0 Comments