सोयाबीन कापणी करताना महिलांच्या हाताच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे महत्त्वाचे आहेत..

 सोयाबीन कापणी करताना महिलांच्या हाताच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे महत्त्वाचे आहेत..


सोयाबीन कापणी करताना सोयाबीनच्या वाळलेल्या शेंगांमुळे शेतकरी महिलांच्या हाताला दुखापत होते आणि हे अतिशय कष्टप्रद काम आहे. हातमोजे वापरल्यास हातांची सुरक्षितता होऊ शकते. म्हणूनच सुरक्षित हातासाठी आणि सोयाबीन कापणी सुलभ होण्यासाठी सोयाबीन कापणी हात मोजे वापरणे फायदेशीर ठरते. हे हातमोजे शिवून विक्री केल्यास एक चांगला उद्योग देखील होतो. सदरील सोयाबीन कापणी हात मोजे शिवण्याचे प्रशिक्षण आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे रिलायन्स फाउंडेशन प्रकल्प च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले गेले. शिवणकाम येणाऱ्या 50 हून अधिक महिला नायगाव आणि बिलोली तालुक्यातून या प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्या.

Post a Comment

0 Comments