नायगाव येथील मांजरम येथे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत शेती दिन कार्यक्रम उत्साहात साजरा

उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. संतोष चव्हाण, कापूस प्रकल्पातील श्री. प्रभुदास उडतेवार, श्री. बालाजी चंदापुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थळी गावचे सरपंच रावसाहेब शिंदे हे होते.
डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्य स्थितीत असलेला कापूस, थंडी मुळे होऊ शकणारा गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव, दादा लाड कापूस तंत्रज्ञान, हरभरा पिकातील किड व रोग यांच्या संदर्भात घ्यावयाची काळजी, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन इ. बद्दल सखोल माहिती दिली. शेतकऱ्यांनी फरदड कापूस न घेता श्रेडर मशीनच्या सहाय्याने कापसाच्या पर्हाटीची कुट्टी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केले.
कापूस प्रकल्पातील श्री. प्रभुदास उडतेवार यांनी सघन पद्धतीने कापूस लागवड, गळ फांदी कापणे तसेच शेंडा खुडणे याबाबत मार्गदर्शन करुन या बाबींचे कापूस उत्पादन वाढीमधील महत्व याबद्दल माहिती दिली.
डॉ. संतोष चव्हाण यांनी भाजीपाला लागवड, योग्य वेळी फांद्यांची छाटणी, खत व्यवस्थापन, फळबाग लागवड याबद्दल माहिती देत असताना शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नाचे निरसन केले. श्री. बालाजी चंदापुरे यांनी सघन लागवड पद्धत व पारंपरिक पद्धतीने लावलेला कापूस यांच्यातील फरक सांगितला. प्रकल्पातील प्रगतिशील शेतकरी श्री. जनार्दन जाधव, श्री. आनंद शिंदे, श्री. गणेश माली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दादा लाड कापूस पद्धतीचा झालेला फायदा इतर शेतकऱ्यांना सांगितला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
.
0 Comments