काटकळंबा येथे जनावरांच्या आरोग्य तपासणी उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्ड तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान पशु आरोग्य तपासणी व वंध्यत्व निवारणा शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीर दरम्यान पाळीव प्राण्यांचे आजार आणि त्यांची तपासणी, लंपी रोगाबाबत मार्गदर्शन व उपचार तसेच विविध शासकीय योजना बद्दल पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जनावरांची सर्वसाधारण तपासणी व उपचार, गर्भ तपासणी, जंतू निर्मूलन, लसीकरण, लंपी आजार उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गाई आणि म्हशी मध्ये आढळणाऱ्या वंध्यत्व समस्यांवर संप्रेरकांचा (हार्मोन्स चा) वापर करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या स्वीकार्य चाचपणी कार्यक्रमातून संप्रेरके उपलब्ध करून देण्यात आली. पावसाळा चालू असल्याने वातावरणात बदल होऊ होत आहे. या कारणामुळे अनेक जनावरे आजारी पडू शकतात. विविध आजारांची लक्षणे ते दाखवू शकतो. यावर वेळीच उपाययोजना करून आजारांची निदान करणे आवश्यक असते तसेच लंपीच्या पार्श्वभूमीवर गावातील पशुंना गोचीड गोमाशी व इतर बाह्यपर्जीवांपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठीचे मार्गदर्शन देखील या कार्यक्रमांमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला एकूण 40 शेतकर्यांनी सहभाग नोंदवला आणि एकूण 74 पशूंची तपासणी करून घेतली. #animallover #animal #care #health #camp #पशु #animalwelfare #farmanimal #पशुआरोग्यतपासणी #लालकंधारीगाय #DharmaDonkeySanctuary #DDS #धर्माडोंकीसॅक्चूरी
0 Comments