शेळ्यांमधील साथीचे आजार आणि प्रतिबंध उपाययोजना

शेळ्यांमधील साथीचे आजार आणि प्रतिबंध उपाययोजना


संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र आणि BCRC प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/१/०२४ रोजी गाव भोसी ता.बिलोली येथे शेळ्यांचे आजार व लक्षणे आणि उपचार या विषयी शेळीपालक यांचे प्रशिक्षण झाले. या गावात शेळ्यांना साथीचा आजार झालेला आहे अशी माहिती तिथल्या पशू सखीनी डॉ. निहाल मुल्ला यांना दिली आणि त्या माध्यमातून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मागील काळात गावपातळीवर कार्य करू शकणाऱ्या निवडक महिलांना "पशूसखी" करिता यापूर्वी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र आणि BCRC दोघां मार्फत दिलेले होते. यातूनच तयार झालेल्या पशू सखी कडून उपाय योजना करण्या हेतूने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी डॉ. निहाल मुल्ला यांनी आजारी शेळयाचा उपचार याविषयी माहिती दिली. तसेच ता. प्रकल्प समन्वयक यांनी SSM RF BCRC Project, Sagroli यांच्या वतीने राबवित सलेले उपक्रम, हवामान अनुकूल शेतीपद्धती याविषयी माहिती दिली. यावेळी पशुसखी सौ.सविता इरना बासरे यांनी उत्कृष्ट सहकार्य केले. एकूण १९ शेळी पालकानी कार्यक्रमात सहभाग घेतला. पुढील औषधोपचार व उपाययोजना बाबत मदत करण्याचा निर्धार सौ. सविता यांनी व्यक्त केला. #animalrescue #animalwelfare #careanimals🐏🐰🐴🐼🐱🐶 #goatary #farmwomen







Post a Comment

0 Comments