हवामान अनुकूल शेती पद्धती" प्रकल्पातील विस्तार कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

हवामान अनुकूल शेती पद्धती प्रकल्पातील विस्तार कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.


रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून "हवामान अनुकूल शेती पद्धती प्रकल्प" संस्कृति संवर्धन मंडळ व दिलासा जनविकास प्रतिष्ठान मार्फत नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुदखेड व उमरी या तालुक्यात राबवण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी कडून या प्रकल्पातील कृषी विस्तार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात रब्बी पिकातील मुख्य अडचणी व उपायोजना , मराठवाडा विभागासाठी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपन्याचे सक्षमीकरण व व्यवसाय वृद्धी, गाव पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी व उपायोजना इत्यादी विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व श्री.व्यंकट शिंदे यांनी मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणात प्रकल्पातील २० प्रशिक्षकांनी सहभाग घेतला.या प्रसंगी रिलायन्स फाउंडेशन चे नांदेड जिल्हा समन्वयक श्री योगेश जोशी उपस्थित होते. #Reliance #foundation #Dilasa #climate #smart #agriculture #change #हवामान #अनुकूल #शेती




Post a Comment

0 Comments