Invest on her. महिलांसाठी गुंतवणूक करा....

यावर्षीच्या जागतिक महिला दिनाच्या थीमवर आधारित संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, रिलायन्स फाउंडेशन आणि दिलासा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटक रिया जोशी, इंडिया फेलो तसेच मुख्य मार्गदर्शिका सौ श्रद्धा रोहित देशमुख, शिक्षण समन्वयिका व उद्योजिका, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांनी विशेष मार्गदर्शन महिलांना केले. महिलांमधील आहार, आरोग्याच्या समस्या, उद्योग, आर्थिक सबलीकरण, सामाजिक व मानसिक स्वास्थ्य या अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. माधुरी रेवनवार यांनी अध्यक्षीय समारोप मध्ये महिलांनी उद्योग व्यवसायासोबतच सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देणे आता गरज झाली आहे या विषयावर मत मांडले. सोबतच श्री सर्जेराव ढवळे यांनी महिला व बालसंगोपनाच्या शासनाच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमांमध्ये अनेक महिला भगिनींनी त्यांचे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे श्री गणेश वर्मा श्री खंडागळे तसेच संस्कृती संवर्धन मंडळाचे कार्यकर्ते श्री शिवाजी केंद्रे श्री नरहरे श्री वड्डे व इतर सहकाऱ्यांनी व्यवस्थापन पाहिले. महिलांचे विविध खेळ या प्रसंगी घेण्यात आले व त्यांना शेती उपयोगी गांडूळ खत बॅग आणि कोळपे बक्षीस म्हणून वितरित करण्यात आले. #women #empower #agriculture

0 Comments