सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..

सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..



कार्यक्रमासाठी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश पाटील, कोल्हापूर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि गाढव पालन या महत्वाकांक्षी योजना आणि त्यांसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, नियम, अटी आणि प्रस्ताव दाखल करताना आणि त्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीना असलेल्या सर्व शंका आणि अडचणी बाबत विस्तृत माहिती दिली. एन. एल. एम. अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायात उतरता यावे आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची आणि शुद्ध जातीची करडे आणि कुक्कुटपिल्ले उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ५० % पर्यंत अनुदान देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प शेतकऱ्याला उभारता येतो. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनाहो योजना राबविताना येणारी दुसरी अडचण म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन. यासाठी कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन तसेच, डॉ. संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि संसाधनामध्ये यशस्वी शेळीपालनाची पंचसूत्री बाबत त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी शेतकऱ्यांकडील शेळीपालनाची उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) सुरु होणाऱ्या “पशुसंवर्धन पंधरवडा २०२४” याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागींच्या कौशल्य आणि ज्ञानात वाढ करून पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि या क्षेत्रात उद्यमशीलता वाढविणे असे होते. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून पशुधन उत्पादकता वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळू शकेल. कार्यक्रमामध्ये इच्छुक शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे विविध पदाधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) इतर महत्त्वाच्या व्यक्ति अश्या एकूण ११० व्यक्तींचा समावेश होता. #agriculture #animals #poltryfarming #Goatfarminginindia #KrishiVigyanKendra #skills

Post a Comment

0 Comments