विज्ञान अभ्यास दौऱ्याअंतर्गत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेस भेट..

विज्ञान अभ्यास दौऱ्याअंतर्गत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेस भेट..


इयत्ता नववी व दहावीच्या 80 विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अटकळी येथील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेस आज भेट दिली. जिरेनियम, सिट्रोनिला व लेमन ग्रास या वनस्पती पासून सुगंधी द्रव्य तेल निर्मिती कशी होते याची प्रत्यक्ष माहिती घेतली. सुडोप्लस (सुडोमोनास फ्ल्यूरोसन्स) मायक्रोप्लस, मेटाप्लस, बायोप्लस इत्यादी जैविक औषधे कशी तयार होतात याबद्दलची माहिती जाणून घेतली.या प्रयोग शाळेत जैविक खते तयार केली जातात. शेतीतील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असणारी पोषद्रव्य तसेच कीड नियंत्रण किंवा पिकावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी जैविक खतांचा वापर होतो.
इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये जैव तंत्रज्ञान हा घटक अभ्यासासाठी आहे.हा घटक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष भेटीद्वारे अधिक सुस्पष्ट व्हावा या उद्देशाने प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री अशोक फुलेवार व श्री पांडुरंग कदम यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. सदरील प्रयोगशाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक श्री जीवन जाधव व श्री मधुसूदन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. #education #Students #savesoil #school #india #EducationCannotWait #EducationMatters #EducationForAll #KrishiVigyanKendra #sagroli #kvksagroli





Post a Comment

0 Comments