एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये चिकट सापळे: वापर आणि महत्त्व

एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये चिकट सापळे: वापर आणि महत्त्व

चिकट सापळा हा एक प्रकारचा ग्लू ट्रॅप आहे जो गोंदाच्या थराने झाकलेल्या पुठ्ठ्याने बनलेला असतो. गोंद इतका चिकट आहे की जेव्हा एखादा कीटक त्याला स्पर्श करतो तेव्हा गोंद त्यांना कायमस्वरूपी ठेवतो आणि त्यांना तुमच्या शेतात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करत. पिवळे चिकट सापळे हे मावा, पांढरी माशी,तुडतुडे ई. अनेक कीटकांवर लक्ष ठेवण्याची एक सामान्य पद्धत. चिकट सापळे हे झाडाच्या उंचीवर किंवा त्यापेक्षा वरच्या उंचीवर लावावे. दर 3 ते 4 आठवड्यांनी सापळे बदलावे किंवा जेव्हा ते कीटकाच्या ढिगाऱ्याने झाकले जातात तेव्हा.

त्यांचा आकार  १५ X ३० सेंमी असेल तर दर १०० चौ. मी. साठी एक सापळा लावावा.

वांगी, मिरचे, टोमॅटो, भेंडी या भाजीपाला पिकात प्रती १० चौ. मी. मध्ये एक सापळा लावावा.

३० X ४० सेंमी आकाराचा चिकट सापळा हा कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी साठी 40 ते 60 प्रति एकर लावावे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चिकट सापळ्यांचे काही वैशिष्ट्ये

1. पर्यावरणपुरक दिर्घकाळ टिकण्याची क्षमता, किटकांची रंगाकर्षता विचारात घेऊन २ रंगांमध्ये उपलब्ध (पिवळा व निळा)

2. ऊत्कृष्ठ दर्जाचा डिंक – कमी तापमानात न गोठणारा आणि जास्त तापमान / उन्हामुळे न वितळणारा.

3. संपुर्णतः विषमुक्त.

4. कुठलेही रासायनीक घटक नाहीत.

5. दर्जेदार प्लॅस्टीकमुळे सापळॆ कुजत नाहीत अथवा त्यांचा रंग फिका पडत नाही.

6. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किंवा पावसामुळे डिंकाची कार्यक्षमता कमी होत नाही.

7. सर्व प्रकारच्या फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच पॉलीहाऊस / शेडनेट मध्ये वापरता येतात.

8.सुरुवातीच्या काळातच किटकांचे नियंत्रण होत असल्याने फवारणीचा खर्च वाचतो.

9.चिकटलेल्या किटकांच्या संख्येवरून किटकनाशके फवारणीचे नियोजन करता येते.








Post a Comment

0 Comments