Celebrating the unique creativity and innovation of students for the farmers
- Increased Productivity
- Resource Efficiency
- Resilience to Climate Change
- Improved Livelihoods
- Food Security
- Technological Advancement
- Environmental Sustainability
- Drudgery Reduction
- Climate Smart & Cost Effective Agriculture Technologies
- Soil & Water Conservation
- Post Harvesting & Processing Technologies / Methods / Techniques
1. School
2. College / Higher Education
संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे २९ जानेवारी २०२५ ला विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरीसाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा २०२५ आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा (कृषिवेद-२०२५) भाग असेल. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी या स्पर्धा आयोजन केले आहे.
संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या मार्गदर्शनाखाली ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सव (कृषिवेद-२०२४)” चे आयोजन केले जाते. यावर्षी दि. २९, ३०, ३१ जानेवारी २०२५ दरम्यान ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील चर्चा सत्रे, कृषी प्रदर्शनी, प्रक्षेत्रावरील पिक प्रात्याक्षिके, लागवड तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे. यामध्ये हजारो शेतकरी, व्यावसायिक, विस्तार कार्यकर्ते, नामवंत उद्योग समूह तसेच हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा २०२५ आयोजीत करण्यामागे चे उद्दिष्ट सामान्यत: कृषि क्षेत्रातील सर्जनशीलता आणि समस्यांचे निराकरण करणे हे आहे. ही स्पर्धा विद्यार्थी, शेतकरी, व्यक्ती किंवा संघांना नाविन्यपूर्ण उपाय, तंत्रज्ञान किंवा पद्धती विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते ज्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता, टिकाऊपणा आणि एकूण कार्यक्षमता वाढू शकते. या माध्यामातून कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाणे आणि शेतक-यांचे कल्याण, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता यामध्ये योगदान देणाऱ्या प्रगतीला प्रोत्साहन देणे हे ध्येय आहे.
स्पर्धेची थीम
1. कष्ट कमी करणारे तंत्रद्यान
2. हवामान अनुकुलित तंत्रज्ञान आणि किफायतशीर कृषि तंत्रज्ञान
3. मृद व जलसंधारण उपाय योजना आणि तंत्रज्ञान
4. काढणीपाश्चात आणि अन्ना प्रक्रिया आणि त्यासंबंधित तंत्रज्ञान / पद्धत
सहभाग श्रेणी - नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत दोन श्रेणी आहेत
1. शाळा
२. उच्च शिक्षण (पदवी / पदविका)
३. शेतकरी / Innovators
पुरस्काराची रक्कम व परितोषिक प्रथम व दुतीय प्रकल्पाना दिले जातील.
Registration Link- Agriculture Innovation Project Competition 2025
0 Comments