शेतकऱ्यांनी समूहाने शेती करणे भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल – विकसित कृषि संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात शास्त्रज्ञांचे मत
बिलोली (प्रतिनिधी) – “शेतीच्या टिकावू आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटचालीसाठी शेतकऱ्यांनी समूहाने शेती करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कृषी तज्ज्ञांनी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’च्या समारोप कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात विविध गावांतील शेतकरी, कृषी अधिकारी, आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचे कार्यक्रम उमरी तालुक्यातील सोमठाना, बेलदरा, बोथि आणि बिलोली तालुक्यातील हज्जापुर, कवठा व डौर या गावांमध्ये पार पडले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून गटशेतीच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे, शास्त्रज्ञ श्री. डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कपिल इंगळे व डॉ. प्रियंका खोले, श्री वेंकट शिंदे तसेच प्रशांत शिवपणोर, बालाजी चांदापुरे, प्रभुदास उडतेवार आणि संतोष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंधरवड्याचा आढावा:
२९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात राबविण्यात आलेल्या ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, संतुलित खत वापर, मृदा आरोग्य, पीक संरक्षण व शासकीय योजना यांची माहिती देण्यात आली. शिवार भेटी, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, सल्ला शिबिरे आयोजित करण्यात आली.या अभियानात संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळीने मोलाची भूमिका बजावत नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ९० गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांना सानुकूल मार्गदर्शन केले आणि शाश्वत शेतीविषयी जागरूकता वाढवली.
तज्ज्ञांनी सांगितले की, “गटशेतीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सामूहिक वापर करता येतो, उत्पादन खर्चात बचत होते आणि बाजारपेठेवर अधिक नियंत्रण मिळते. यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.”
गटशेतीचे फायदे स्पष्ट करताना पुढील मुद्दे मांडण्यात आले:
- खर्चात बचत
- बाजारपेठेवर नियंत्रण
- जोखीम विभागणी
- प्रक्रिया व मूल्यवर्धन
कृषी विभागाचे अधिकारी श्री. कांबळे यांनी ‘फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन’ (FPO) योजनेच्या अनुदान व NABARD च्या सहकार्याची माहिती दिली.
#ViksitKrishiAbhiyan #ViksitKrishi #ICAR #agriculture #ViksitKrishiAbhiyan #viksitkrishiabhiyan #viksitkrishiabhiyan2025 #viksit_krishi_abhiyan #kvksagroli #KrishiVigyanKendra #agriculture #farmer #farming #ataripune
0 Comments