31 मे मातीचे आरोग्य व नैसर्गिक शेतीचा विकास – विकसित कृषि संकल्प अभियानचा तिसरा दिवस

मातीचे आरोग्य व नैसर्गिक शेतीचा विकास – विकसित कृषि संकल्प अभियानचा तिसरा दिवस


सगरोळी 31 मे 2025 – विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत मातीचे आरोग्य सुधारणे आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने तिसऱ्या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत शेतीतील टिकाऊ तंत्रज्ञान, मृदा आरोग्य कार्डाचे महत्त्व, जैविक खतांचा उपयोग आणि शाश्वत शेतीच्या पद्धती याविषयी कुंडलवाडी, हुंगुंदा, ममदापूर, लघुळ, बडुर, बामणी येथे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीगुरे, श्री. डमाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभूरे, डॉ. निहाल मुल्ला, तसेच भारतीय ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात आणि डॉ. बोरसे यांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढविण्याच्या आधुनिक आणि नैसर्गिक उपाययोजनांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या अभियानाद्वारे देशभरातील 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उपक्रमातून माती परीक्षण, जैविक शेतीच्या पद्धती आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या वैज्ञानिक उपायांवर भर दिला जात आहे.
शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन सत्रांचा सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच नवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास उत्सुकता दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे शेती अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Post a Comment

0 Comments