पाणलोट समिती व शेतकरी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी!
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे ग्रामस्तरीय पाणलोट समिती (VWC) आणि शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कुशवाडी, लिंगणकेरूर आणि रामपूर गावातील शेतकऱ्यांनी यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये जलसंधारण समित्यांची भूमिका, जलव्यवस्थापन, मृद व जलसंवर्धन तसेच पाण्याचा ताळेबंद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश, शेतकऱ्यांना सामुदायिक सहभागातून जलसंधारण संरचनांची योग्य देखभाल करणे आणि त्याद्वारे शेतीत उत्पादकता व उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी मदत करणे हा होता.
चला, एकत्र येऊन आपल्या शेतीला अधिक समृद्ध करूया. #वॉटरशेडप्रकल्प #कृषीविज्ञानकेंद्र #जलसंधारण #शेतकरीप्रशिक्षण #ग्रामविकास #सगरोळी #पाणलोटसमिती #शाश्वतशेती #agriculture #water #budgetingtips #kvksagroli
0 Comments