बेळकोणी येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला

 बेळकोणी येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला



संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, रीलायान्स फौंडेशन हवामान अनुकूल शेती पद्धती प्रकल्प आणि तालुका कृषी अधिकारी बिलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे.बेळकोणी (बु) तालुका बिलोली येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात श्री पवार जे.डी तालुका कृषी अधिकारी बिलोली यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनाबद्दल व राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महोत्सव सिल्लोड आणि पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांनी हवामान बदलाचे फळबाग व भाजीपाला लागवड या वर होणारे परिणाम व उपाय याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हवामान अनुकूल शेती पद्धती प्रकल्पा अंतर्गत होणार्या विविध कामाची माहिती श्री सुनील महाजन यांनी उपस्थितीत शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाचे नियोजन अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी बेळकोणी येथील सर्व शेतकरी बांधवांनी केले. #farms #soil #हवामान_अंदाज #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices



Post a Comment

0 Comments