तीन दिवसीय शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षणाचा
या प्रशिक्षण कार्यक्रमात जो शेळीपालन व्यवसायात रुची घेऊन नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित होता असा तरुण शेतकरी वर्ग सहभागी होता. सदर तरुणांनी सशुल्क नाव नोंदणी करून या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा पशुपुरक व्यवसाय असून, शास्त्रीय माहितीअभावी अनेकांना तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे या कार्यशाळेत वैज्ञानिक पद्धतीने मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
प्रशिक्षणात शेळीपालनाचा पूर्वइतिहास, SWOT Analysis, विविध जाती, गोठा व्यवस्थापन, चारा लागवड, आहार तंत्रज्ञान, आजार ओळख व प्रतिबंध, लसीकरण, जंतूनाशन, एकात्मिक व्यवस्थापन, नोंदी घेणे या विषयांबरोबरच प्रभावी मार्केटिंग, मूल्यवर्धन, नवनवीन संधी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणात डॉ. निहाल, प्रा. व्यंकट तसेच धर्माबाद तालुक्याचे सहायक आयुक्त (प. स.) डॉ. धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग नोंदवून आपले प्रश्न मांडले. एकंदरीत या प्रशिक्षणात स्मार्ट शेळीपालन ही संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रशिक्षणामुळे शेळीपालन व्यवसाय अधिक फायदेशीर व टिकाऊ पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास तयार झाला. प्रशिक्षणाची सांगता प्रशिक्षण प्रमाणपत्र व शेळीपालन संबंधित माहिती पुस्तक आणि पत्रके देऊन करण्यात आली. #शेतकरी #शेती #कृषीविकास #agriculture #goats #farming
0 Comments