कृषि महाविद्यालय नायगावच्या RAWE विद्यार्थ्यांची कृषि विज्ञान केंद्रास अभ्यास भेट

कृषि महाविद्यालय नायगावच्या RAWE विद्यार्थ्यांची कृषि विज्ञान केंद्रास अभ्यास भेट


कृषि महाविद्यालय नायगावच्या अंतिम वर्षातील RAWE (ग्रामीण कृषि कार्यानुभव) कार्यक्रमांतर्गत 80 विद्यार्थ्यांनी आज कृषि विज्ञान केंद्रास अभ्यास भेट दिली. या भेटीचा उद्देश ग्रामीण शेती व्यवस्थापन, तांत्रिक ज्ञान आणि शाश्वत शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळवणे व केव्हीके ची कार्यपद्धती समजून घेणे हा होता. विद्यार्थ्यांनी केंद्रातील विविध विभागांना भेट दिली, ज्यामध्ये मृदा परीक्षण प्रयोगशाळा, कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिके, सेंद्रिय शेतीचे प्लॉट्स, AI आधारित ऊस, आनंदी गोपाळ प्रक्षेत्रातील सर्व केंद्रे आणि विस्तार कार्याचा आढावा घेण्यात आला. केव्हीकेचे डॉ प्रविण यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जलसंधारण आणि शेतकरी सल्ला सेवा, संस्थेची सर्व विभागाची माहिती व केव्हीके ची कार्यपद्धती याविषयी सखोल माहिती दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी संवादाद्वारे तज्ञाचे अनुभव आणि नविन तंत्रज्ञानावरील प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामुळे विद्यार्थ्यांना "लॅब ते लँड" या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन RAWE समन्वयक व कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या भेटीमधून ग्रामीण शेतीचे वास्तव समजून घेतले आणि भविष्यातील कृषि क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. #कृषीशिक्षण #RAWE #कृषीमहाविद्यालय #नायगाव #कृषीविज्ञानकेंद्र #अध्ययनदौरा #शेतकरी #कृषी #kvksagroli #शेतकरीमित्र



Post a Comment

0 Comments