करटूले लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे आयोजित करटूले लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या प्रशिक्षणात डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना करटूले लागवडीचे महत्त्व, योग्य जमीन आणि हवामानाची निवड, लागवडीच्या प्रगत पद्धती, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची सखोल माहिती दिली. याशिवाय, त्यांनी उत्पादन वाढीसाठी परागीभवन प्रक्रिया, पाण्याची बचत करणारे सिंचन तंत्रज्ञान आणि बाजारात योग्य भाव मिळवण्यासाठी प्रभावी विपणन तंत्र यावर विशेष मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना करटूले लागवडीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळाला. #करटूलेलागवड #Spine_Gourd_Cultivation #KVK_Sagroli #शेतकरीप्रशिक्षण #कृषीविज्ञानकेंद्र #नंदेड #KrushiVigyanKendra #Farming #शेतीतंत्रज्ञान #FarmersTraining #Agriculture #Sagaroli
0 Comments