राष्ट्रीय पोषण महिना २०२५ निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र, नांदेड-I, पोखर्णी येथे पोषण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पौष्टिक पाककृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. माधुरी रेवणवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड-II यांनी केले. सहभागी स्पर्धकांनी पालेभाज्या व विविध प्रकारच्या बाजरीपासून पौष्टिक पदार्थ तयार करून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. माधुरी रेवणवार यांनी विविध अंगणवाडी कार्यकर्त्या व स्वयं सहाय्यता गटांच्या सीआरपींना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आरोग्य, पोषण व संतुलित आहार यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच, महिलांच्या आरोग्याशी संबंधित गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व युरिनरी इन्फेक्शन या झपाट्याने वाढणाऱ्या आजारांविषयी कारणे, प्रतिबंधक उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला डॉ. मोरे (संचालक, कृषी विज्ञान केंद्र), डॉ. देविकांत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र नांदेड-I, प्रा. अलका पावले व सौ. तुपटेवार (अंगणवाडी पर्यवेक्षक) तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. #राष्ट्रीयपोषणमहिना2025 #KVKNanded #पोषणजागरूकता #पौष्टिकआहार #बाजरी #कृषीविज्ञानकेंद्र #पोषणअभियान #महिलाआरोग्य #Nanded #पोखर्णी #kvksagroli
0 Comments