मोसंबी पिकासाठी 'आर्का सिट्रस स्पेशल' सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने बिलाळी, ता. मुखेड येथे मोसंबी पिकावरील 'आर्का सिट्रस स्पेशल' या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या वापराविषयी शेती दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. संतोष चव्हाण, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी मोसंबीच्या यशस्वी उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनी नमूद केलं की सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या फवारणीमुळे फळधारणा वाढते, फळगळ कमी होते आणि झाडाची उत्पादनक्षमता सुधारते. यामुळे झाडामधील सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता देखील दूर होते. कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक बागेला भेट देऊन स्वतः या फायद्यांचा अनुभव घेतला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे निरसन करण्यात आले.
हा कार्यक्रम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.


0 Comments