महिलांसाठी पोषणविषयक प्रशिक्षणा
“राष्ट्रीय पोषण माह हा उपक्रम म्हणजे सर्वसामान्यांमध्ये पोषण-जागरूकता निर्माण करून निरोगी व कुपोषणमुक्त भारत घडविण्याचा संकल्प” आहे. याच अंतर्गत दरवर्षी संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर 2025 अंतर्गत आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी ममदापूर (ता. बिलोली) येथे संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पोषणविषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात “कमी खर्चाचे – उच्च पोषणमूल्य आधारित खाद्यपदार्थ” या विषयावर डॉ. माधुरी रेवनवार यांनी मार्गदर्शन केले. महिलांना अपुऱ्या पोषणामुळे होणारे विविध आजार, त्याचे दुष्परिणाम तसेच योग्य आहाराचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यावेळी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारे, कमी खर्चिक परंतु पोषणमूल्याने समृद्ध खाद्यपदार्थ कोणते आहेत याची माहिती देण्यात आली.
तसेच घरगुती पातळीवर या पदार्थांची प्रक्रिया कशी करावी, आहार नियोजनात त्यांचा समावेश कसा करावा याबाबत महिलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन आहारात पोषणसंपन्न अन्नपदार्थांचा समावेश करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन मनीषा भोयेवार यांनी केले. #Women #women #womenpower #WomensHealth #womensfitness #womeninbusiness #womensupportingwomen #womenhealth #womenhealthcare #NationalNutritionMonth #care
0 Comments