मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना कृषी विज्ञान केंद्राकडून भेट, पिक पाहणी व मार्गदर्शन

मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना कृषी विज्ञान केंद्राकडून भेट, पिक पाहणी व मार्गदर्शन


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी (जि. नांदेड) तर्फे लेंडी धरण परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान रब्बी हंगामातील पिक नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच पूरग्रस्त प्रक्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणी व मार्गदर्शन मोहिमेत मुख्यत्वे हसनाळ, भिंगोली, वडगाव, डोरनाळी, भेंडेगाव, भाटापूर आणि रावणगाव या गावांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान खरीप पिकांचे झालेलं नुकसान, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, शासकीय व स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेली मदत, पशुधनाची सद्यस्थिती तसेच भाजीपाला व फळबाग लागवड प्रोत्साहन या विषयांवर शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे प्रा. कपिल इंगळे, डॉ. संतोष चव्हाण आणि श्री. प्रशांत शिवपनोरे यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. #HeavyRain #FarmersFirst #MarathwadaFlood #MaharashtraFlood #FarmRelief #FarmerCrisis #FloodRelief #FaktLadhMhana #मराठवाडापूर #Nanded #मुखेड #KVK_Sagroli #कृषिविज्ञानकेंद्र #RabiPlanning #CropDamage #शेतकरीसंवाद #AgricultureSupport #पूरग्रस्तमदत










Post a Comment

0 Comments