पोषणमूल्य आधारीत एकात्मिक शेती पद्धती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम व प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

पोषणमूल्य आधारीत एकात्मिक शेती पद्धती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम व प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.


सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शेतीतून केवळ एकाच
पिकावर अवलंबून राहून नफा मिळवणे शक्य नाही. तसेच शेतकरी कुटुंबाच्या संपूर्ण पोषणमूल्याच्या गरजा भागवण्यासाठी विविध पिकांचा अवलंब करणे आवश्यक आहे. डाळी, तृणधान्य, तेलबिया व भाजीपाला यांचा समावेश असलेली बहुपीक पद्धती अवलंबल्यास शेतकऱ्यांचा नफा वाढतो तसेच कुटुंबाला पौष्टिक आहार मिळतो.

या बदलत्या परिस्थितीचा व गरजेचा विचार करून कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमांतर्गत महिलांना तेलबियासाठी करडई, जैवसंवर्धित ज्वारी, धने तसेच विविध भाजीपाल्यांच्या बियांचे संच प्रात्यक्षिक म्हणून दिले. या बहुपीक पद्धतीमुळे शेतकरी महिलांना कुटुंबाच्या पोषणमूल्य गरजा भागविण्यासोबतच उत्पन्न वाढविण्याची संधी मिळेल.
डॉ. माधुरी रेवणवार यांनी या उपक्रमाचे महत्त्व व महिला शेतकऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला श्री. कैलास सावंत (सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी) आणि श्री. माधव चिंतले (स्वाभिमानी फार्मर प्रोड्यूसर कंपनी) उपस्थित होते. #agriculture #RuralWomen #health #care #womenhealth #climatechange #ClimateSmartAgriculture

Post a Comment

0 Comments