कांदा उत्पादन तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाच्या आधुनिक आणि प्रभावी तंत्रांची माहिती देऊन त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा होता. प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना DOGR, पुणे यांनी विकसित केलेल्या 'भीमा शक्ती' (Bhima Shakti) या नवीन वाणाचे बियाणे 'स्वकार्य चाचणी प्रयोग' अंतर्गत वाटप करण्यात आले.या प्रसंगी डॉ. संतोष चव्हाण यांनी कांद्याचे उत्पादन वाढविण्याच्या विविध तंत्रांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मातीची योग्य निवड, भीमा शक्ती वाणाचे वैशिष्ट्य, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणीची योग्य वेळ व पद्धती, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, काढणी व साठवणुकीच्या प्रभावी पद्धती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल माहिती दिली. संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या विद्यमाने ईश्वरनगर (ता. उमरी) येथे कांदा उत्पादन तंत्रज्ञानावर यशस्वी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात १८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #कांदाप्रशिक्षण #OnionTraining #कांदाउत्पादन #OnionProduction #कृषिविज्ञानकेंद्र #KrishiVigyanKendra #शेतकरीप्रशिक्षण #FarmerTraining #भीमाशक्ती #BhimaShakti #OnionFarming #AgriculturalTraining #ModernFarming #Horticulture #KVK #FarmerEmpowerment #kvksagroli


0 Comments