मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन…

 मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन…

नांदेड जिल्ह्यातील बरबडा ता. नायगाव हे गाव मिरची पिकासाठी प्रसिद्ध आहे, पण गेल्या काही वर्षापासून मिरची पिकावर हुमणी अळी, फुलकिडे व चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मिरची पिकाची ओळख कायम ठेवण्यासाठी गावातील काही तरुण शेतकऱ्यांचा निर्धार होता, त्या अनुषंगाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत “मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” याविषयी प्रथमदर्शनी कार्यक्रम राबविण्यात आला. ऑगस्ट महिन्यात प्राथमिक बैठक घेऊन ठराविक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि किड व रोग व्यवस्थापन संबंधी ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, कामगंध सापळे, निंबोळी पावडर, चिकट सापळे ई. निविष्ठा वाटप करण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली व शिफारशीनुसार निविष्ठांचा वापर केला. दि. १६/११/२०२२ रोजी सदर शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी देऊन पिक पाहणी करण्यात आली असता एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनामुळे फुलकिडे, हुमणी अळी तसेच चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व प्रयोगाबाबत समाधान व्यक्त केले. #chilli #pest #scientistsforfuture #climateresilientagriculture #farmers #farming #kvksagroli #nanded #pestcontrol #मिरची
🌶️🌶️





Post a Comment

0 Comments