महिला उद्योजकता: कुटुंब सबलीकरणाचा उत्कृष्ट पर्याय

 महिला उद्योजकता: कुटुंब सबलीकरणाचा उत्कृष्ट पर्याय


वाढती महागाई आणि तुलनेने उत्पन्नात वृध्दी न होणे आणि यानंतर कुटुंबावर येणाऱ्या असंख्य अडचणींविषयी आपण सर्वजण ज्ञात आहोत. एकाच उत्पन्न स्त्रोत मधून बचत करून भांडवल उभारणी करणे आणि त्यातूनच आणखी एक उत्पन्नाचा स्त्रोत उभा करणे याला आजच्या युगात पर्याय नाही. आज शेतीसंबंधी च्या प्रत्येक कामात महिला समान प्रमाणात कार्यरत आहेत. मग त्यांना व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी आणि संघटित होऊन त्यांनी व्यवसाय निवड करावी यासाठी प्रशिक्षण देणे हेतू काल दिनांक 16/11/22 रोजी बरबडा ता. नायगाव येथे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "पशुधनातून घडणारे उद्योग आणि महिला उद्योजकता" या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात पशुधनातील उद्योग जसे की, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ विक्री इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. तसेच उद्योग निवडीसाठी अनेक पर्याय जसे की, परसबाग, पापड बनवणे, मिरची आणि मसाला बनवणे तसेच इतर कौशल्य पूर्ण व्यवसाय बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एकूण 17 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर शेळीपालन आणि परसबाग साठी रुची दाखवणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याकरिता शेळीपालन किट तसेच बियाणे किट देण्यात आले. #women #womeninbusiness #womenempowerment #womensupportwomen #womensupportingwomen #womenempoweringwomen #rural #agriculture #kvksagroli #nanded PMO




Post a Comment

0 Comments