लिंबू तोडणे झाले सोपे...

 लिंबू तोडणे झाले सोपे...


लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लिंबाची तोडणी करताना काही समस्यांना सामोरे जावे लागते . झाडाचे लिंबू खाली पडून खराब होतात, त्याला मार लागतो अशा लिंबाला भाव कमी येतो. तसेच काम वाढते. लिंबू सहज आणि स्वच्छ पद्धतीने तोडता यावे , नुकसान होवु नये आणि काम कमी व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी नागठाणा येथील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना गृह विज्ञान विभागा अंतर्गत जून 2022 मध्ये लिंबू तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक दिले होते. सदरील यंत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून थोडे बदल करण्यात आले आणि पुन्हा याचे प्रात्यक्षिक आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर देण्यात आले शेतकऱ्यांनी सुचवलेले बदल अतिशय फायदेशीर ठरले. तसेच सदरिल यंत्राचा शेती दीन आज घेन्यात आला. तसेच जमलेल्या शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांबद्दल डॉ निहाल मुल्ला यांनी माहिती दिली. #lemon #harvester #agriculture #kvksagroli #nanded #agri #fruit #orchard #farmer #farm





Post a Comment

0 Comments