हरभरा व ज्वारी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

 हरभरा व ज्वारी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन


रिलायन्स फाऊंडेशन आणि संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकलेगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे हरभरा व ज्वारी पिकांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. हरभरा आणि ज्वारी ही गावातील प्रमुख रब्बी पिके आहेत आणि त्या अनुषंगाने डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना हरभरा आणि ज्वारी पिकांवरील कीड व रोगांची ओळख आणि त्यांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या इतर पिकातील कीड व रोगाबद्दल असलेल्या शंकांचे निरसन केले. श्री. दीपक महाजन यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. #farmer #farming #pest #disease #kvksagroli #nanded #agriculture #rabi2022

Post a Comment

0 Comments