कांदा उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन:

कांदा उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन:



कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत बिलोली तालुक्यात कांदा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. संतोष चव्हाण, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. कांद्याचे उत्पादन कमी असणे तसेच रब्बी हंगामात कांद्याखालील क्षेत्र कमी असणे ही मोठी समस्या असून, कांदा पिक हे अधिक उत्पादन देणारे आहे. या अनुशगाने कांदा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात २१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणामध्ये कांदा उत्पादन वाढीसाठी पुढील मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले:

• माती व वाण निवड: योग्य माती व उच्च उत्पादनक्षम वाणांची निवड.
• रोपवाटिका तयारी व पेरणी: निरोगी रोपे तयार करण्याची पद्धत, योग्य पेरणी वेळ व तंत्र.
• बीज प्रक्रिया: रोग व कीड नियंत्रणासाठी बियांची योग्य प्रक्रिया.
• खत व्यवस्थापन: अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर.
• रोग व कीड व्यवस्थापन: एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण.
• कापणी व साठवण: काढणी व साठवणीतील नुकसान टाळण्यासाठी योग्य तंत्रज्ञान.
या उपक्रमाचा उद्देश स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान व कौशल्ये देऊन कांदा उत्पादनात वाढ घडवून आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.


SSM’S Krishi Vigyan Kendra (KVK), Sagroli, Organizes Training to Boost Onion Yield for Farmers in Biloli

Recognizing that regional onion productivity is significantly below the average, with yields of only 50-60 quintals per acre compared to the standard 100 quintals, Dr. Santosh Chavan, Subject Matter Specialist (Horticulture) at Krishi Vigyan Kendra (KVK), Sagroli, conducted a farmer training program in Chinchala, Biloli. The low yield and limited area under rabi onion cultivation present a challenge, especially since onion is a high-value crop with the potential to provide strong returns for farmers.

The program, attended by 21 farmers, focused on detailed strategies for increasing onion production. Key topics covered included:

Soil and variety selection: Choosing the right soil and high-yield varieties.

Nursery preparation and sowing: Best practices for raising a healthy nursery and effective sowing methods and timing.

Seed treatment: Techniques to protect seeds from diseases and pests.

Fertilizer management: Efficient and effective nutrient application.

Disease and pest management: Integrated strategies for controlling pests and diseases.

Harvesting and storage: Proper techniques to minimize post-harvest losses and ensure product quality.

This initiative aims to equip local farmers with the knowledge and skills necessary to improve their onion cultivation, ultimately leading to higher yields and increased income.




Post a Comment

0 Comments