"अनुभवातून शिक्षण" संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घेतली "मूरघास निर्मिती" आणि "पशुपालन" बाबत माहिती

"अनुभवातून शिक्षण" संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घेतली "मूरघास निर्मिती" आणि "पशुपालन" बाबत माहिती - नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये "कृतीशील शिक्षण" ला फारच महत्त्व आहे. यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून गोष्टी शिकतात. याच आधारावर श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय मधील 10 वी मधील विद्यार्थ्यांनी 'मूरघास बनवण्याचे तंत्रज्ञान ' विषयी माहिती घेतली तसेच ९ वी मधील विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान या घटकाच्या अंतर्गत शेतीपूरक व्यवसाय, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, तसेच शेळीपालन व जनावरांचा गोठा, जनावरांचे प्रकार, त्यांच्या आरोग्याची काळजी, गोठ्याची स्वच्छता याबद्दल सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या मनात असलेले प्रश्न त्यांनी मांडले आणि त्याची उत्तरे मिळवली. #students #rural #youth #agriculture #ABTL #education #activitybasedlearning






Post a Comment

0 Comments