राजमा पिक व फळबाग लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

 राजमा पिक व फळबाग लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित


सुजलेगाव येथे रब्बी हंगामातील हरबरा या पिकला पर्यायी पिक मन्हून राजमा या पिकाची जवळपास ४० एकर वर लागवड करण्यात आली आहे. तसेच सदरील गावामध्ये मोसंबी व कागदी लिंबू या फळ पिकाची लागवड हि मोठ्या प्रमाणा मध्ये आहे. या अनुषंगाने संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र व ए ई जी फाउंडेशन अंतर्गत दि १०/०१/२०२३ रोजी सुजलेगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे राजमा पिक व फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
सदरील प्रशिक्षणा अंतर्गत प्रा कपिल इंगळे यांनी राजमा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग नियत्रण तसेच काढणी, मळणी व बाजार व्यवस्थापन ई. बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ संतोष चव्हाण यांनी फळबाग लागवड करताना जमनी ची निवड, लागवड पूर्व तयारी, रोपे निवडताना व लागवड करताना घावयाची काळजी, बागेचे शाकीय व्यवस्थापन व खत व्यवस्थापन ई. विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री.युवराज मादेशवार प्रोजेक्ट लीड ,सिजेंटा फाउंडेशन इंडिया. यांनी सिजेंटा फाउंडेशन प्रकल्पाचे कार्य व कृषी उदोज्गता या विषय शेतकरी ना मार्गदर्शन केले. #vegetables #agriculture #nanded #fertilization #farms #soil #हवामान_अंदाज #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices #rajma #crop







Post a Comment

0 Comments