पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व आणि प्रमाण वाढण्याच्या उद्देशाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक प्रधान्य वर्ष


पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व आणि प्रमाण वाढण्याच्या उद्देशाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक प्रधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. तसेच संक्रांत भोगी हा दिवस तृणधान्य दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणूनच या निमित्ताने आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि कृषी विभाग बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने तृणधान्य दिवस बिलोली येथील साने गुरुजी विद्यालय, व आंतरभारती माध्यमिक विद्यालय येथे आयोजित केला गेला. या कार्यक्रमांमध्ये
विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्यांचे जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, भगर याचे आहारातील महत्त्व डॉ. माधुरी रेवणवार यांनि समजाऊन सांगुन संक्रांत व भोगीचे महत्व सांगितले. तसेच ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील डॉक्टर शेख यांनी विद्यार्थ्यांना आहाराचे महत्व सांगितले. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री पवार , मुख्याध्यापक श्री. चांदनकर, सौ. पटने मॅडम यांनी देखील मुलांना तृणधान्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #women #empowerment #IYM2023 #YearofMillets #Millets #kvksagroli #nanded #agriculture #food #healthyeating


Post a Comment

0 Comments