ग्रीन टी व्हि आयोजीत किसान चौपाल कार्यक्रमात संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे मार्गदर्शन....
कापूस व्यवस्थापन गाडी देखभाल आणि मिलेट्स ची शेती या विषयावर आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी नांदेड येथे ग्रीन टीव्ही यांनी किसान चौपाल कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांमध्ये डॉ. माधुरी रेवनवार यांनी भरड धान्याचे आरोग्यासाठी महत्त्व व शेतीमध्ये सद्यस्थिती याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक कपिल इंगळे यांनी कापूस पिकासाठी आवश्यक माती परीक्षण व जमीन आरोग्य याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बऱ्हाटे , धनुका अग्रीटेक ली. चे श्री. करेवर उपस्थीत होते. कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments