भरडधान्य प्रक्रिया उद्योगवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम….

 भरडधान्य प्रक्रिया उद्योगवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम….  


संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग सांगोला, उमेद अभियान व कासाळगंगा फाउंडेशन महूद (बु) जि.सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने दि. 07 ते 09 ऑगस्ट 2023 दरम्यान तीन दिवसीय निवासी "भरडधान्य प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते" सदरील प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकूण 30 महिला उपस्थित होत्या. प्रशिक्षणामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, भगर इ.भरडधान्यापासून शेवई, चकली, शंकरपाळे, लाह्या, लाडू, केक, बिस्कीट, थालीपीठ, दलिया, भाजणी, असे अनेक पदार्थ कसे बनविले जातात हे शिकविण्यात आले याचे प्रात्यक्षिक स्वतः या महिलांनी करून बघितले याशिवाय मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, प्रकल्प सादरीकरण, वेळेचे नियोजन, भांडवल व्यवस्थापन,इ. विषयावर डॉ.माधुरीताई रेवनवार, प्रा.सुनीता पोफळे, प्रा.व्यंकट शिंदे, श्री. संतोष उलगडे, श्री. दत्ता गिराम यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन गुगल मीटद्वारे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी, डॉ.सुमंत पांडेजी, अभिनेता चिन्मय उदगीरकर व आदरणीय जलनायक श्री. प्रमोदजी देशमुख यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन केले.

#rural #empoweringwomen #womenbusinesses #trainingcamp #skills #youth #kvk #sagroli #nanded




Post a Comment

0 Comments