सही पोषण देश रोशन...

 सही पोषण देश रोशन...

जमिनीचे असो किंवा व्यक्तीचे, दोन्हीच्या आरोग्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. जमिनीला नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठांद्वारे आणि व्यक्तीला पोषक अन्न पदार्थांमधून पोषण मिळते. व्यक्तीच्या पोषणासाठी पौष्टिक तृणधान्य तसेच सर्व प्रकारच्या भाज्यांची आवश्यकता असते. म्हणूनच आज दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी गाव समराळा तालुका धर्माबाद येथे पोषण बागेचे प्रकार, महत्त्व आणि आखणी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांना व महिलांना सुधृढ आरोग्यासाठी पोषण बाग तृणधान्य व विविध प्रकारचा भाजीपाला याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष पोषण बागेची आखणी करुन दाखवली. तसेच तेथील शेतकरी महिलेच्या घरचे बायोगॅस युनिटला भेट देण्यात आली. धर्माबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचा प्रशिक्षण लाभार्थी श्री खपाटे बनाळीकर यांची श्री शिवशंकर दाल मिल या युनिटला देखील भेट दिली. #agriculture #sagroli








Post a Comment

0 Comments