कुक्कुटपक्षामधील लसीकरण या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण





"परसबागेतील कुक्कुटपालन" हा एक जुन्या काळापासून सुरू असलेला उपक्रम आजही शेतकऱ्याच्या अंगणात सुरू आहे. कालांतराने यामध्ये अनेक बदल घडून आलेले दिसतात. शेतकऱ्याच्या आर्थिक तसेच पोषण आणि आरोग्य प्रश्र्नी या परसबागेतील कुक्कुट पक्षांचा फायदा अनेकदा होतो. परंतु या मध्ये अनेकदा साथीचे रोग होतात आणि मोठ्या प्रमाणावर मर्तुक होते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लसीकरण हा उपाय योग्य ठरतो. परंतु अनेक शेतकऱ्यांना लसीकरण कोणते करावे? कधी करावे ? कसे करावे? असे अनेक प्रश्न आणि समस्या उद्भवतात.
याच अनुषंगाने, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि जीवा प्रकल्प, गंगणबीड यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि. ३०/०९/२३ रोजी " कुक्कुटपक्षामधील लसीकरण" या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात लसीकरण म्हणजे काय? त्याचे महत्त्व, कार्यपद्धत, कोंबड्यांना कोणते लसीकरण करावे? कधी करावे? लस कशी बनवावी? शीत साखळी म्हणजे काय? ती कशी साध्य करावी? आणि कुक्कुट पक्षांना लसीकरण कसे करावे? या सर्वांचे प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रम दरम्यान माहिती पत्रके शेतकऱ्यांना देण्यात आली आणि नंतर शेतकऱ्याच्या हस्ते त्यांच्या कोंबड्यांचे लसीकरण करून घेण्यात आले. तसेच उर्वरित कोंबडया करीता गावामध्ये लस उपलब्ध करून देण्यात आली. #kvksagroli #agriculture #poultry
0 Comments