शेळ्या मधील प्रथमोपचार पद्धती या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
नायगांव ता. नायगांव येथे कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि BCRC प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पशुसखी‘ म्हणून काम करत असणाऱ्या महिलां करिता शेळ्या मधील प्रथमोपचार पद्धती या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शेळीपालन व्यवसायाबाबत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची उजळणी, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, आजार आणि माज ओळखण्याची लक्षणे तसेच प्रथमोपचार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची माहिती आणि वापरायची पद्धत समजवण्यात आली. कार्यक्रमामध्ये ‘पशुसखी‘ या प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि फायदेही सांगण्यात आले. तसेच पुढील प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक करिता कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमात एकूण १५ पशुसखी आणि १ शेतकरी उपस्थित होते. #animallover #goatfarmingbusiness #kvksagroli #farm #farming #agriculture #nanded #trainingday #पशुसखी #शेळ्यांचे_लसीकरण #शेळ्यांचे_खाद्यव्यवस्थापन #शेळ्यांचे_उपचार
0 Comments