फुले तोडणे झाले सोपे....
झेंडूची फुले तोडताना पारंपारिक पद्धतीमध्ये महिला किंवा शेतकरी एका हातामध्ये टोपलं किंवा पिशवी घेऊन दुसऱ्या हाताने फुले तोडतात. परंतु यामध्ये वेळ जास्त जातो. हा वेळ कमी करण्यासाठी आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी काटकळंबा ता. कंधार या गावामध्ये फुले तोडण्यासाठी वापरण्याच्या बॅगचे प्रशिक्षण संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत देण्यात आले. काटकळंबा या गावांमध्ये संस्थेच्या पाणलोट विकास प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना झेंडूच्या पितांबर आणि अष्टगंधा वाणाची रोपे देवुन फुल शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांनी भरघोस असे उत्पन्न काढलेले आहे. पुढील चार दिवसांमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर या फुलांची विक्री शेतकरी करणार आहेत. #agriculture #farming #farm #flowerfarmer
0 Comments