दुधापेक्षा दुधाच्या पदार्थांना जास्त किंमत असते, त्याचा फायदा घ्या

 दुधापेक्षा दुधाच्या पदार्थांना जास्त किंमत असते, त्याचा फायदा घ्या

भारतामध्ये आज दूध उत्पन्न आणि दुधाचा वापर हा सगळ्या जगामध्ये सर्वाधिक आहे. आपण आज पशुधनाच्या संख्येत आणि दूध उत्पन्नात जगात प्रथम क्रमांकावर आहोत. अनेक शेतकरी शेतीसोबत दुधाचा व्यवसाय करताना दिसतात. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाची आणि घरातील महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात मदत होते. परंतु अनेकदा या महिलांना पुरेश्या माहिती अभावी या व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि संधी दोन्हीं बाबी लक्षात येत नाहीत. याच अनुषंगाने देगलुर तालुक्यातील वाझरगा गावातील 31 महिलांना कृषि विज्ञान केंद्र,सगरोळी येथे उद्यमिता लर्निंग सेंटर च्या माध्यमातून "दुधाळ जनावरांचे संगोपन आणि दुग्ध उत्पादने निर्मिती" या विषयावर दि.१ जानेवारी २०२४ रोजी एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये दुधाळ पशूंच्या प्रचलित जाती,त्यांची निवड करण्याची पद्धत,व्यवसायात असलेल्या अडचणी,खाद्य व्यवस्था आणि कासदाह सारख्या आजारापासून बचाव करण्याचा पद्धतीची माहिती देण्यात आली. तसेच दुग्ध पदार्थ निर्मिती साठी कराव्या लागणाऱ्या कृती सांगण्यात आल्या. यातून रोजगार कसा करावा किंवा या व्यतिरिक्त शेळीपालन गांडूळखत निर्मिती यामध्ये कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याबाबत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाची सांगता उत्कर्ष खाद्य प्रक्रिया केंद्राला भेट देऊन करण्यात आली. #milk #दुध #दुधउतपादकशेतकरी🐄 #womenpower #businessowner #rural #womenpower #animal #agriculture






Post a Comment

0 Comments