नवनिर्वाचित सरपंचांकरिता उपग्रहाच्या माध्यमातून ग्राम-मानचित्र पोर्टल च्या वापराविषयी चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
🛰📡🪐
दि. १९ जानेवारी २०२४ रोजी कृषि विज्ञान केंद्र, नवनिर्वाचित सरपंचांसाठी ग्राम मानचित्र पोर्टल- या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. ज्यामध्ये ग्राम मानचित्र पोर्टल हे काय आहे ? ते कसं हाताळायचे ? आपलं गाव कसं दिसतंय आपल्या गावाचा नकाशा कसा आहे ? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या टूल्स (Tools) कसे वापरायचे ? कि, ज्याच्या सहाय्याने आपल्याला गावातील रस्ते, शेत जमीन, घराची जागा यांची लांबी मोजता येते. गावाजवळील असणारे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र विहीर, तलाव, नदी यामधील खोली मोजता येते. यामुळे सरपंचांना आपल्या गावाचा वार्षिक आराखडा तयार करता येईल व त्याप्रमाणे आर्थिक नियोजन सुद्धा करता येईल. या सोबत ग्राम मानचित्र पोर्टल हे उपग्रह (Satellite) च्या साहाय्याने कसं काम करते व रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सॅटॅलाइट चा किती वापर व ते कुठे कुठे होतो याची माहिती देण्यात आली. यावेळी २४ नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होता. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथील संगणक तज्ञ श्री. सुप्रबंध भावसार यांनी मार्गदर्शन केले. #satellites #gram_manchitra_application #training #ICAR #kvksagroli #उपग्रह #ग्राम_मानचित्र #पोर्टल #प्रशिक्षण #सरपंच #सॅटॅलाइट
0 Comments