हवामान बदल अनुकूल कार्यक्रम प्रकल्पा अंतर्गत पिक प्रात्यक्षिकांवर शेती दिन साजरा..

हवामान बदल अनुकूल कार्यक्रम प्रकल्पा अंतर्गत पिक प्रात्यक्षिकांवर शेती दिन साजरा..


संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी अंतर्गत नाबार्डच्या सहकार्यातून हवामान बदल अनुकूल कार्यक्रम लाठ खुर्द, काटकळंबा,घोडज ,उमरज, केदारवडगाव या पाच गावात राबवण्यात येत आहे. केदारवडगाव तालुका नायगाव येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करून हरभरा, रब्बी ज्वारी, करडई व गहू इत्यादी पिकांचे प्रात्यक्षिके देण्यात आली होती. या पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यासाठी शेती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान व त्याचे फायदे, रब्बी पिक संरक्षण व उन्हाळी पीके (उन्हाळी ज्वारी, उन्हाळी तीळ व उन्हाळी भुईमूग) लागवड ई. विषयावर मार्गदर्शन केले आणि उपस्थित शेतकऱ्यांसह रब्बी ज्वारी आणि हरभरा पीक प्रात्यक्षिके पाहणी केली . या कार्यक्रमासाठी गावातील 50 पेक्षा अधिक शेतकरी व महिलांचा सहभाग होता. 
#climatechange #ClimateSmartAgriculture #हवामानबदल #शेती #दिन #नाबार्ड





Post a Comment

0 Comments