ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन महत्वाचे; सगरोळी येथे ज्वारी पिक परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला आशावाद

 ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन महत्वाचे; सगरोळी येथे ज्वारी पिक परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला आशावाद


सगरोळी :  मराठवाड्यातील ज्वारी या प्रमुख भरडधान्य पिकाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेड येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध तज्ज्ञांनी ज्वारी पिकाच्या पुनरुज्जीवनावर आपली मते मांडताना ज्वारी पिक वाढेल, त्याचा विकास होईल, असा आशावाद परिषदेच्या पहिल्या दिवशी व्यक्त केला आहे. ही परिषद संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि आर.आर.ए नेटवर्क, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

मराठवाड्यातील ज्वारी हे प्रमुख भरडधान्य पीक असून मागील काही वर्षापासून ज्वारी पिकात घट होत आहे. पिकाचे पेरणी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये ज्वारी पिकाच्या पुनर्जीवनासाठी, ज्वारीमध्ये सुधारित वाणाचा वापर, ज्वारी काढणी व प्रर्कियेमध्ये यांत्रिकीकारणाचा वापर, भरडधान्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातुन ज्वारीमध्ये विविध समस्या, आंतरपिक व मिश्रपिक पद्धतीचा वापर, प्रक्रिया उद्योग चालना व आहारातील समावेश वाढ ई. विविध विषयावर चर्चासत्र केली गेली. तर दुसऱ्या दिवशी प्रक्षेत्र भेट आणि निवडक ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन केले होते.


या परिषदेच्या  अध्यक्षस्थानी संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व अफार्म, पुणे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख यांनी सर्वांच्या समन्वयातून शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन भरडधान्य क्षेत्र वाढ व प्रक्रिया उद्योगात चालना द्यावे असे सूचित केले. मराठवाड्यातील ज्वारीच्या सद्यस्थिती विषयी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी माहिती दिली. डॉ. परशुराम पत्रोलटी, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्था अंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर यांनी ज्वारीचा धान्यासाठीच वापर न करता त्याचा वापर विविध अंगांनी (हुरडा, चारा, पापड, पॉपकोर्न, इथेनॉल निर्मिती)  करावा. व भविष्यातील भरडधान्य कार्यक्रमासाठी केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्था हैद्राबाद, सर्वोतपरी सहकार्य करेल असे सांगितले. व.ना.म.कृ. वि. परभणी चे शास्त्रज्ञ डॉ. खजीर बेग,  यांनी महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या ज्वारीच्या वाणाविषयी माहिती देऊन त्याची उपयुक्तता सांगितली व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्वारीचे बिजोत्पादन कार्यक्रम राबवून शेतकऱ्याला बियाणे उपलब्ध करून द्यावे असे सूचित केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे डॉ. एस एन सोलंकी यांनी या चर्चा सत्रात भाग घेत आपले मत मांडले. त्यांनी, ज्वारी पिकाच्या पेरणीपासून काढणी पर्यंत तंत्रज्ञानाची कशी मदत घेता येईल. यासाठी ज्वारी कापणी  यंत्र तयार केली जात असल्याचे सांगितले.त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या डॉ. प्रीतम भुतडा यांनी, ज्वारीच्या उपयुक्तता यावर भर देताना ज्वारीच्या वाणांवर आपले मत मांडले.

यावेळी दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेडचे डॉ. सतीश कारंडे यांनी आपल्या मनोगतात, राज्यातील हवामान बदलाचा विचार मांडला. तसेच त्यांनी, यावेळी निसर्ग चक्रात झालेल्या बदलाचा पावसाच्या ऋतूमानावर झालेल्या बदल सांगितला. तसेच या बदलामुळे मराठवाड्यातील ज्वारी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून त्याचा हंगाम बदल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.






ॲग्रोवन डिजिटलचे धनंजय सानप यांनी ज्वारी शेतकऱ्याच्या समस्या मांडल्या. तेलंगणा राज्यातील मिलेट मिशन पुरस्काराचे विजेते श्री. वीरशेट्टी पाटील यांनी, भरड धान्याचे महत्व विषद करून त्यापासून विविध पदार्थ निर्मिती बद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी भरड धान्यांना पुढील पाच वर्षात याला चांगले दिवस येतील असे म्हटले आहे. श्री. अविल बोरकर ग्रामीण युवा प्रतिष्ठान मंडळ, भंडारा यांनी भरडधान्या विषयी आपले अनुभव कथन केले. नांदेड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी भरडधान्य लागवड व प्रक्रिया या विषयी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजने विषयी माहिती दिली. व जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड श्री. दिलीप दमय्यावार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी नाबार्ड व इतर बँकाची मदत घ्यावी असे सूचित केले. के व्हि के हिंगोली चे प्रमुख डॉ.शेळके ,अमृतात्ल्याम शेतकरी उत्पादक कं कडून श्री माधव तरकंटे यांनी सहभाग नोंदवला. या परिषदेच्या शिफारसीच्या आधारावर मराठवाड्यातील ज्वारी पुनरुज्जीवीत कारयासाठी आराखडा बनवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले, व स्वागत समन्वयक श्री. व्यंकट शिंदे, डॉ. कृष्णा अंभुरे व आर.आर. नेटवर्कचे महाराष्ट्र समन्वयक श्री. सजल कुलकर्णी यांनी केले.



Two days’ state-level consultation on “Revival of sorghum in Marathwada region” held at SSMKVK Sagroli

SSM, KVK Sagroli in coordination with RRA network Maharashtra organized two days’ state level consultation on “Revival of sorghum in the Marathwada region on 13-14 Feb 2024 at KVK sagroli. On the first day of the consultation, various experts while presenting their views on the revival of sorghum crop have expressed the hope that sorghum crop will grow and develop.
Sorghum is the major staple crop in Marathwada and the sorghum crop has been declining for the past few years. The area under cultivation is decreasing day by day. In this two-day consultation for the revival of sorghum crop given emphasis on use of improved varieties in sorghum, mechanization in sorghum harvesting and processing, various schemes of the state government for millets, various problems in sorghum from the farmer's perspective, use of intercropping and mixed cropping, promotion of process industry and increase in inclusion in diet. Seminars were held on various topics. On the second day, a field visit to millet and a discussion was organized with selected sorghum farmers.
This consultation was chaired by Shri.Pramod Deshmukh SSM Sagroli and AFARM Pune Chairman.other participants were Dr. Parashuram Patrolati, Senior Scientist, IIMR CRS Solapur, VNMKV Parbhani scientist Dr. Khajir Baig, Dr. SN Solanki, Dr. Dr. Pritam Bhutda, Maharashtra Knowledge Corporation Ltd Agri Head Dr. Satish Karande, Millet man of Telangana State and owner of SS bhavani food Mr .Veerashetty Patil, Rural Youth Foundation Board, Bhandara Mr. Avil Borkar ,Nanded District Superintendent Agriculture Officer Shri. Bhausaheb Barhate, District Manager NABARD Shri. Dilip Damiyawar, Agrowon Digital multimedia producer Mr. Dhananjay Sanap, RRA Network's Maharashtra Coordinator Shri. Sajal Kulkarni, Head of KVK Hingoli Dr. Shelke, Mr. Madhav Tarkante CEO Amritlyam Farmer Producer Company Ltd Belconi, KVK Head Dr. Madhuri Revanwar and other scientist Prof Kapil Ingle, Dr.Krishna Ambhure, were participated in consultation.
Based on the consultation action plan for revival of sorghum for marathwada region will be prepared by RRA Maharashtra and KVK. 

Post a Comment

0 Comments