शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे कार्य... आमदार जीतेश अंतापूरकर

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे कार्य... आमदार जीतेश अंतापूरकर

तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप. 



गत बारा वर्षांपासून येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. दरवर्षी तंत्रज्ञान महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी कृषी ज्ञान व माहितीची शिदोरी घेऊन जात आहेत, ह्याचा परिणाम दिसत असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे कार्य असल्याचे गौरवोद्गार बिलोली - देगलूर मतदार संघाचे आमदार जीतेश अंतापूरकर यांनी काढले. सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुनील देशमुख, सरपंच गोदावरी उस्केलवार, संजीव सगरोळीकर, डॉ माधुरीताई रेवणवार आदींची उपस्थिती होती. यावर्षीचे अकरावे कृषी तंत्रज्ञान महोत्सव असून दरवर्षी  मिळणारा शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहिल्यास शेतकऱ्यांसाठी होणारे केंद्राचे कार्य लक्षात येते. ग्रामीण भागातील महिलांनी शेती व्यवसायाबरोबरच इतर शेती पूरक व्यवसाय करावेत. परिसरातील शेतकरी व कृषी विज्ञान केंद्राच्या विकासासाठी  माझे नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी अंतापुरकर यांनी दिली. सुनील देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया करून विकावा. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतील अशी ग्वाही दिली. तंत्रज्ञान महोत्सवातील सर्व स्टॉलधारकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्कॅन करा माहिती मिळवा. 



कृषी विज्ञान केंद्रातर्फे या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध पिके व प्रात्यक्षिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्याची व्यवस्था केली होती.  प्रत्येक पिकांच्या माहितीचे क्यू आर कोड जागोजागी लावण्यात आले होते. अनेक शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये क्यू आर कोड स्कॅन करतांना दिसत होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी ही माहिती मोबाईलवर मिळत असल्याने  या तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त करतांना दिसले.









Post a Comment

0 Comments