कृषी तंत्रज्ञान महोत्सवात नांदेड जिल्ह्यातील महिला शक्ती एकवटली.

कृषी तंत्रज्ञान महोत्सवात नांदेड जिल्ह्यातील महिला शक्ती एकवटली. 



समाजामध्ये महिलांचे योगदान खूप महत्वाचे असून घरी काम करणाऱ्या महिलांनी आपल्यातील कौशल्याचा उपयोग करून उद्योगामध्ये गुंतवून घ्यावे असे प्रतिपादन जेष्ठ मानव विकास तज्ञ विशाला पटनम यांनी केले. सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार (ता.८) रोजी जिल्ह्यातील महीलशक्ती एकवटली होती. यावेळी अध्यक्षस्थानी प्रणीताताई देवरे चिखलीकर, संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, सगरोळीच्या सरपंच गोदावरी उस्केलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय बेटीवार, कृषी अधिकारी अरुण बनकर, रिलायन्स फाउंडेशनचे नितीन शर्मा व जितेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राच्या माधुरीताई रेवणवार यांची उपस्थिती होती. महिलांनी एखाद्या व्यवसायात गुंतून घेतले पाहिजे, कौशल्य आत्मसात करून व्यवसायामध्ये गुंतवून ठेवावे व आत्मनिर्भर बनावे. महिला व बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असते. यासाठी सकस आहार घ्यावा, यामध्ये भरड धान्याचा भरपूर वापर करावा. बालकांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांची वाढ कशा पद्धतीने होते हे प्रात्यक्षिकाद्वारे वाढांक पडताळणीचे तंत्र सांगितले. 




श्रद्धा ढवण यांनी, दुग्ध व्यवसाय करताना जनावरांसाठी दर्जेदार गोठा, चांगले वातावरण, पोषक व उच्च दर्जाचे पशुखाद्य, स्वच्छ पाणी आदींची काळजी घेणे गरजेचे आहे. शेणापासून सेंद्रिय खते व  बायोगॅसच्या माध्यमातून उर्जा निर्मिती केली जाऊ शकते. आज माझ्याकडे दुग्ध व्यवसायासाठी जवळपास शंभर म्हशी असून दु मजली  गोठ्याचे व्यवस्थापन केले आहे. हा व्यवसाय शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासारखा असून यापुढे महिला गटांच्या माध्यमातून पाच हजार म्हशींचे व्यवस्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स फाउंडेशनचे नितीन शर्मा यांनी, येथील संस्थेसोबत नांदेड जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये हवामान बदल व महिला विकास कार्यक्रम राबविला जात असल्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्रणिताताई चिखलीकर यांनी, शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले. सगरोळीसारख्या ग्रामीण भागामध्ये कार्यक्रमासाठी हजारो महिला एकत्र येतात ही कृषी विज्ञान केंद्रावरील विश्वासार्हता स्पष्ट होते. रेवती कानगुले व निलावती दळवे या यशस्वी महीला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. 








Post a Comment

0 Comments