SAC Meeting 2020

वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक (SAC)


कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी च्या वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक मंगळवार, दि. 15 डिसेंबर 2020, रोजी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन मा.श्री प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस व.ना.म.कृ.वि परभणी चे विस्तार शिक्षण, संचालक, डॉ डी. बी. देवसरकर ,सेंद्रिय शेती तज्ञ श्री. दिलीपराव देशमुख तसेच जिल्ह्यातील कृषी, पशुसंवर्धन , नाबार्ड, लीड बँक, माविम, धान फौंडेशन इ. विभागाचे अधिकारी, निमंत्रित शेतकरी, शेतकरी महिला प्रतिनिधी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी ही उपस्थित होते. या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी 2020 या वर्षभरात केलेले कार्य आणि 2021 या वर्षातील कामाचे नियोजन यावर सादरीकरण केले, या वेळी अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना शेतकरी व उपस्थित अधिकाऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले व काही चांगल्या सूचना पण केल्या. त्या सूचनांची अंमलबजावणी या वर्षा मध्ये कृषी विज्ञान केंद्रा कडून केली जाणार आहे. बैठकी पूर्वी मान्यवरांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्राला व प्रात्याक्षिक प्रकल्पांना भेट दिली.












Post a Comment

0 Comments