SAC Meeting 2021

शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा – डॉ डी बी देवसरकर



शेतकऱ्यांनी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेऊन पिक उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वयंपूर्ण झाले पाहिजे तसेच शेती आणि शेती आधारित उद्योगाची कास धरली तरच शेतकरी टिकून राहील असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांनी केले. २ डिसेम्बर २०२१ रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड कार्यालयाचे अधिकारी डॉ. काशिनाथ बडीहवेली यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय सुरु करण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारो श्री पी एस देशपांडे यांनी रेशीम विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. रमेश पासलवाड तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbt पोर्टलवर एकच अर्ज करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी श्री विश्वास वाघमारे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी तंत्रज्ञान प्रचारासाठी आकाशवाणीवर भाषण देण्याबाबत आग्रह व्यक्त केला. सौ सुजाता पोहरे प्रकल्प अधिकारी बार्टी, सामाजिक न्याय विभाग कार्यालय नांदेड यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.


कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सुरेश कुलकर्णी यांनी २०२१ या वर्षात कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कामाचा आढावा प्रस्तुत केला. प्रा कपिल इंगळे यांनी कृषी विद्या, डॉ माधुरी रेवणवार यांनी गृह विज्ञान, डॉ कृष्णा अंभुरे यांनी पिक संरक्षण, डॉ संतोष चव्हाण यांनी उद्यान विद्या, डॉ निहाल मुल्ला यांनी पशु संवर्धन आणि श्री रवी मिद्दलवार यांनी प्रक्षेत्राचा २०२१ चा आढावा २०२२ सालचा कृती आराखडा मांडला. वसंत रावणगावकर यांनी संस्थे अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या विकास प्रकल्पाची माहिती दिली


प्रगतीशील शेतकरी श्री शंकर जाधव यांनी रुंद सरी वरंबा पद्धती आणि ट्रायकोडर्मा बिजप्रक्रियेमुळे हरभरा पिकातील मर रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे तरी या बद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता करावी असे वावाहन केले. सौ. स्वाती चिंचोले (प्रगतीशील महिला शेतकरी) यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाबद्दल कृषि विज्ञान केंद्रामार्फत खूप माहिती मिळाली, यासोबतच कृषि विज्ञान केंद्रामधील इतर प्रयोगदेखील गावामध्ये आयोजित करावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या. प्रगतीशील शेतकरी श्री. धोंडीराम सुपारे कमी खर्चात कांदा चाळ बनविण्यासाठी शासनाकडून जाळी खरेदी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या. कृषी विज्ञान केंद्राने मागील १० वर्षात केलेल्या कामाचे संकलन करून आलेल्या अडचणी, संधी आणि त्यामधून साधलेली प्रगती याबाबत विस्तृत पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशन तयार करावे अशी अपेक्षा बैठकीचे अध्यक्ष आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक श्री रोहित देशमुख यांनी व्यक्त केल्या. या बैठकीस, श्री गणेश पठारे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नांदेड, श्री किरण चांदोरकर, अनिल यादव व्यवस्थापक SBI नांदेड, श्री राजेंद्र टोणे तंत्र अधिकारी उविकृअ देगलूर, श्री कोरके नरोजी आणि श्री पठाण टी.ए. जिल्हा रेशीम कार्यालय नांदेड, सौ स्वाती प्रकाश चिंचोले आणि सौ सौ पंचफुला वड्डे शेतकरी महिला प्रतिनिधी तर श्री धोंडीराम सुपारे आणि श्री मारोती वड्डे, डॉ शंकर जाधव हे शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुकाराम मंत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वेंकट शिंदे यांनी केले. #kvk #sagroli #nanded #farm #sac

Post a Comment

0 Comments