SAC Meeting 2023

शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा

– डॉ.डी बी देवसरकर


शेतकऱ्यांनी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेऊन पिक उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वयंपूर्ण झाले पाहिजे तसेच शेती आणि शेती आधारित उद्योगाची कास धरली तरच शेतकरी टिकून राहील असे आवाहन व.ना.म.कृ.वि.वि. शिक्षण संचालक डॉ. डी बी देवसरकर यांनी केले. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.रविशंकर चलवदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व त्यासोबतच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंबंधी सुचना केली. कृषी विज्ञान केंद्राने मागील १० वर्षात केलेल्या कामाचे संकलन करून आलेल्या अडचणी, संधी आणि त्यामधून साधलेली प्रगती याबाबत विस्तृत पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशन तयार करावे असे अध्यक्ष आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री.प्रमोद देशमुख यांनी व्यक्त केल्या. #agriculture #SAC #meeting #kvksagroli #nanded #farmers












Post a Comment

0 Comments