SAC Meeting 2024

 वैज्ञानिक सल्लागार समितीचे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे यशस्वी आयोजन




आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेवुन दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या कार्याचा आराखडा तयार करत असते. शेतकरी, शास्त्रज्ञ व शासन एका व्यासपीठावर येवुन गरजेनुरुप कृती आराखडा तयार करण्यासाठी दर वर्षी कृषी विज्ञान केंद्रात वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात येते. या वर्षीची बैठक कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली.
कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या प्रत्येक शास्त्रज्ञाने आपापले सादरीकरण सर्व मान्यवरांच्या समक्ष केले व त्यावर मान्यवरांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे येत्या वर्षामध्ये कशा पद्धतीने आम्ही काम करू याबद्दल खात्री दिली. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक सादरीकरणानंतर आपल्या महत्त्वाच्या सूचना प्रत्येक विषय विशेषज्ञांना केल्या. उपस्थित शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील आपल्या सूचना व अपेक्षा सदर बैठकीत मांडल्या. सदर कार्यक्रमांमध्ये श्री अनिल शिरफुले उपसंचालक आत्मा यांनी वेगवेगळी निदर्शने सांगत कृषी विज्ञान केंद्राबरोबर कृषी विभाग व आत्मा सतत कार्य करण्यासाठी तत्पर राहील अशी ग्वाही दिली. डॉ बी व्ही आसेवार यांनी देखील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांच्यातल्या नात्याबद्दल बोलताना आपण एकमेकांच्या सोबत काम करावं व शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याबद्दल विविध सूचना केल्या.अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना श्री रोहित देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्र व संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ही संस्था शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांसाठी आम्ही तत्पर असल्याचं बैठकीत सांगितलं तसेच कुठल्याही येणाऱ्या सूचनांचा समावेश करून आम्ही आमच्या कार्यपद्धतीत बदल करू अशी खात्री दिली. 







Post a Comment

0 Comments